CoronaVirus- चिंता वाढली नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ५७ नवे करोना पॉझिटिव्ह आतापर्यंत जिल्ह्यात ७३९ रुग्णांना डिस्चार्ज - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Wednesday, May 27, 2020

CoronaVirus- चिंता वाढली नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ५७ नवे करोना पॉझिटिव्ह आतापर्यंत जिल्ह्यात ७३९ रुग्णांना डिस्चार्ज


नाशिक : जिल्ह्यात आज सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात एकूण ५७ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १०५८ वर पोहचली आहे.त्यातील एकूण ७३९ जण करोनातुन मुक्त झाले आहेत

नाशिक शहरातील रुग्ण संख्या अचानक वाढली असून सिन्नर , येवला , सटाणा गावांमध्ये रुग्ण वाढले असल्याचे चित्र आहे. सध्यास्थितीत नाशिक शहरासह जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह उपचार घेत असलेले एकूण रुग्ण संख्या ही  2५९ असून आतापर्यंत एकूण ७३९ जण करोनातुन मुक्त झाले आहेत. नाशिक ग्रामीणमधील ९८, मालेगावमधील ५६१, नाशिक शहरातील ४३, तर जिल्ह्याबाहेरील ३७ रुग्णांचा यात समावेश असून  करोना विषाणूमुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहर – १३८ ( बरे झालेले रुग्ण – ४३), नाशिक ग्रामीण – १५७ ( बरे झालेले रुग्ण – ९८ ), मालेगाव – ७१५ ( बरे झालेले रुग्ण – ५६१ ), दुसर्‍या जिल्ह्यातील रुग्ण हे नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेले – ४८ ( बरे झालले रुग्ण ३७) असे एकूण २५९ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत  आहे. आज (दि. २७ मे) सापडलेल्या रुग्णांमध्ये सिन्नरचे रुग्ण जास्त आहे.  आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातील  १०६२४ करोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यातील ९१२५ अहवाल निगेटिव्ह तर १०५९ अहवाल पॉझिटिव्ह  आले असून ४४६ अहवाल प्रलंबित  आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor