एन के फिल्म्स मल्टी मीडिया प्रोडक्शन " येसु मी भेटाले " या आहिराणी गाण्यातून पहिल्यांदाच अभिनेत्री रिंकु शिरसाट यांच खानदेशात पदार्पण ! - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Thursday, September 24, 2020

एन के फिल्म्स मल्टी मीडिया प्रोडक्शन " येसु मी भेटाले " या आहिराणी गाण्यातून पहिल्यांदाच अभिनेत्री रिंकु शिरसाट यांच खानदेशात पदार्पण !


 धुळे - दि.२३, खान्देशातील नावाजलेले निर्माते/ दिग्दर्शक नरेंद्र कोळी सर यांनी अनेक कलावंत यांना आहिराणी चित्रपटात व आहिराणी गाण्यांमधून संधी दिली आहे गेल्या २० वर्षांपासून नरेंद्र काेळी यांच्या आहिराणी गाण्यांवरच प्रेम अखंडपणे सुरूच आहे नरेंद्र काेळी यांनी सन २००० साली शिरपूर येथे " कलंक " हा आपला पहिला चित्रपट निर्माण केला, अनेक चित्रपटात मुख्य भूमिकांसह इतरही भुमिका यशस्वीपणे केल्या आहेत त्याचबरोबर स्वतःच गीतरचना कथानक व शूटिंग रेकॉर्डिंग अशा एकापेक्षा जास्त गोष्टी ते साकारत असतात.नरेंद्र कोळी यांनी आता नवोदित कलाकारांना सोबत घेऊन महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या आहिराणी साँग" येसु मी भेटाले " या  फुल एचडी व्हिडिओ  सुपर डुपर हिट झाले आहे. पहिल्यांदाच एन के फिल्म्स अँड मल्टिमीडिया या प्रोडक्शन मधून खान्देशात पहिल्यांदाच आहिराणी गाण्यांमधून नावरूपास येणारी अभिनेत्री रिंकू शिरसाट ला नरेंद्र कोळी यांनी एन के फिल्म्स अँड प्रोडक्शन हाउस मधून लाँच केले आहे,अहिराणी सोंग हे आठ लाख वर गेले आहे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या आहिराणी साॅग ला प्रचंड प्रमाणात हिट केली आहे, नरेंद्र कोळी सरांनी या आपल्या खानदेश भूमीला अनेक हिट झालेले साॅग दिलेले आहे"  सावन महिना मा " पाेर उनी लग्न ला " येसु मी भेटाले " असे अनेक साॅग महाराष्ट्र गुजरात, एम पी , या शहरात हिट झाले आहेत नरेंद्र कोळी यांनी यापूर्वी अनेक कलाकारांना आहिराणी साॅग मधुन संधी दिली आहे, तिच संधी आता पुन्हा एकदा रिंकू शिरसाठ यांच्यावर विश्वास दाखवून दिलेली आहे, या संधीचे सोनं करून अनेक कलावंत नावरूपास आले आहेत व गेल्या आठवड्यात रिलीज झालेले आहिराणी साॅग " येसु मी भेटाले " या गाण्यांमधून अहमदाबाद येथील रिंकू शिरसाठ या तरुणीला आपल्या एन के  फिल्म प्रोडक्शन मधून अभिनयास सुरुवात करून दिली आहे रिंकु चा हा पहिला चित्रित केलेला आहिराणी साॅग आहे, या सोबत आणखी चार गाण्यांचे चित्रीकरण झाले आहे लवकरच हे साॅग एन के फिल्म्स धुळे या चॅनलवर आपला पाहावयास मिळणार आहे ,या साँगसाठी प्रोत्साहन देणारे रिंकू शिरसाट यांचे वडील शंकर शिरसाठ व आई वंदनाबाई शिरसाट यांचा खूप मोठा सपाेट होता आपल्या मुलीला अभिनेत्री होण्याचा बहुमान मिळाला व खान्देशात आहिराणी चित्रपटात व गाण्यांमधून आपल्याला पुन्हा एकदा अभिनय पाहावयास मिळणार आहे,एन के फिल्म्स अँड मल्टी मीडिया स्टुडिओ या प्रोडक्शनचे दिग्दर्शक/ मालक मंगेश काेळी, सहाय्यक दिग्दर्शक - तेजस माळी  यांनी खूप मेहनतीने चित्रीकरण करून संकलन केले आहे, निर्माता - नरेंद्र कोळी या साॅगचे रेकॉर्डिंग किरण ढाेले यांनी केले व गाण्याचे गीतकार - समाधान रोटे असून गायिका - रोहिणी पाटील यांनी आपल्या सुंदर आवाजात स्वरबद्ध केले आहे,गौरव काळंगे यांनी संगीत दिले आहे ,या आहिराणी साॅग मध्ये मुख्य भूमिकेत- मयुर बारसकर व रिंकु शिरसाट यांनी अभिनय केला आहे, या गाण्यासाठी सहकार्य लाभले श्री प्रदीप पाटील (माउली ब्रॅण्ड धुळे ,वायपूरकर) अजय फिल्म प्रोडक्शनचे निर्माते / दिग्दर्शक विजय भामरे, अॅडव्होकेट विलास भामरे व इंजिनिअर श्रीराम साळुंखे व लवकरच एन के फिल्म्स धुळे तर्फे खान्देशातील प्रेक्षकांसाठी नवीन एचडी व्हिडिओ गाण्याचे साँग रिलीज होतील,तसेच भविष्यात रिंकू शिरसाट चांगली अभिनेत्री म्हणून चांगली व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या सर्वांच्या मनात घर करून राहील यात काही शंका नाही,रिंकू शिरसाट ला सप्ताहिक- विजय संग्राम व अजय फिल्म्स प्रोडक्शन यांच्यावतीने भावी वाटचालीस शुभेच्छा.                                              लेखक- मुख्य संपादक - विजय भामरे (९९२२८२८९२२)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor