राखी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निर्भयांचे साकडे..श्रीमती निलमताई नेतकर - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Monday, August 3, 2020

राखी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निर्भयांचे साकडे..श्रीमती निलमताई नेतकर

  
( धुळे येथील निर्भया समितीच्या महिला सदस्य )
धुळे दि.३ (प्रतिनिधी ) आधीच तोट्यात रुतलेले रा.प. महामंडळाचे चाक covid-19 च्या महामारीमुळे आर्थिक गर्तेत रुतत चाललेले आहे.फक्त जिल्हांतर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत फक्त बावीस प्रवाशांची वाहतूक यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबले आहे. त्याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यापासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. आधीच कमी पगार असलेल्या या कामगारापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न समोर उभा ठाकलेला आहे. त्यात प्रशासन रोज वेगवेगळी परिपत्रके प्रसारित करून कामगारांची मानसिकता अधिक हतबल करीत आहे. या आर्थिक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी व कामगारांचे वेतन त्वरित अदा करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या धुळे निर्भया समितीच्या महिला कामगार सदस्य यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना मदतीची विनंती केली आहे. राखी पौर्णिमाच्या भाऊ-बहिणीच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील निर्भया सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवून कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे,वेतनाचा प्रश्न त्वरीत,सोडवावा अशी ही ओवाळणी या मंत्रीमहोदय भावांनी,निर्भयांनाद्यावी अशी मागणी केलेली आहे
   प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवणार आहेत अशी माहिती धुळे येथील निर्भया सदस्या श्रीमती निलमताई नेतकर यांनी दिली. या निवेदनाची दखल त्वरीत घेतली जावी ही विनंती सर्व महाराष्ट्रातील निर्भया आपल्या कुटुंबासहित करित आहेत असे धुळे येथील निर्भया सदस्या श्रीमती निलमताई नेतकर यांनी सांगितले आहे





No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor