मुंबई - दि.१४ ,रा.प.महामंडळ, मध्यवर्ति कार्यालय,मुंबई येथे आज ऑल इंडिया पँथर सेनेने मा.शेखर चत्रे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले व गंभीर इशारा ही दिला आहेदु दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांची थट्टा थांबवून सन २०१९ अंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील चालक तथा वाहक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या स्थगितीचा निर्णय तात्काळ रद्द करणे बाबत निवेदन दिले आहेशासनाच्या निर्णयामुळे शहीद झालेला प्रशिक्षणार्थी विशाल हटवार, अमोल माळी यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत दिली पाहिजे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी सरळसेवा भरती सन २०१९ अन्वये जाहिरात क्र. १/२०१९ नुसार एस.टी. महामंडळाने रिक्त असलेल्या जागी चालक तथा वाहक पदाची एकूण ८०२२ पदे भरण्याचा निर्णय घेतला तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदांकरिता प्रशिक्षघेत आहेत व या चालक तथा वाहक प्रशिक्षणामध्ये औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ, असे एकूण २३६ मुलीही प्रशिक्षण घेत होत्या.परंतु कोरोनाच्या नावाखाली या २०१९ च्या शेतकऱ्यांच्या लेकरांना ४५०० प्रशिक्षणार्थी चालक तथा वाहक कर्मचाऱ्याना घरी बसवले. म.रा.प. महामंडळाच्या हिटलरशाही धोरणाच्या जी.आर. मुळे विशाल हटवार व अमोल माळी यांनी आत्महत्या केली ही आत्महत्या नसून हे म.रा.प. महामंडळाने केलेली हत्या आहे. जेंव्हा या निर्णयाविरोधात आंदोलन उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली तेंव्हा पुन्हा या पीडित कर्मचारांच्या हातावर तुरी देण्याचं ढोंग केलं. स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनी ४५०० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची स्थगिती उठवल्याचे वृत्तमान पत्रातून प्रसिद्ध केल.
जेंव्हा संदर्भ : क्र. राप / कर्मवर्ग / म.ब. / ससेभ / २३७४ दि. ०३/०९/२०२० रोजीच्या जी. आर मध्ये फक्त अनुकंपा तत्त्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगिती या पत्राद्वारे उठवण्यात आल्याचे जाहीर केले.
परंतु शेतकऱ्यांचे लेकरं असलेल्या प्रशिक्षणार्थी ३२०० कर्मचारी व यातील २३६ मुली यांची स्थगिती उठवण्यात आलेली नाही. सर्वच स्थगिती उठवल्याचा डंका वाजवला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करताना लाज कशी वाटली नाही ? ऑल इंडिया पँथर सेना या प्रश्नाला घेऊन गंभीर आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम केलेले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही नौकरी लावतो म्हणून मत मिळवली सत्ता आली, की या लेकरांना हाकलून लावण्याचं काम केलं आहे. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थट्टा आहे. हा प्रश्न अतिशय गंभीर असून ऑल इंडिया पँथर सेना सत्तेसाठी वापर केलेल्या शेतकऱ्यांचा अवमान खपवून घेणार नाही.
दुसरीकडे मोठ्या थाटामाटात मुलींची भरती करतोय म्हणत, त्यांना विद्यावेतन देण्याची घोषणा मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पत्र देऊन केली होती आजवर त्यांना एक रुपयाही विद्यावेतन दिलं नाही उलट त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम केलं. शहीद झालेल्या विशाल हाटवार, अमोल माळी यांच्या कुटुंबाचे साधे सांत्वन सुद्धा केले नाही. निर्दयी आणि संवेदनहीन वृत्तीचा आम्ही धिक्कार करतो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे ३२०० कुटुंब उद्धवस्त झाले आहेत, मानसिक तणावात आहेत, एका पाटोपाट एक आत्महत्या करीत आहेत, ज्यांची लग्न नौकरीच्या नावावर जमली त्यांची लग्न मोडली आहेत. हे कर्मचारी आत्महतेच्या वाटेवर आहेत.
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करीत आहे की, ४ दिवसात तात्काळ ३२०० प्रशिक्षणार्थीची स्थगिती उठवा अन्यथा पँथर स्टाईल अचानकपणे उद्रेकी स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची दखल घ्यावी.
मागण्या :
१) शेतकऱ्यांचे लेकरं असलेल्या ३२०० चालक तथा वाहक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी व प्रशिक्षण सुरू करावे
२) २३६ मुलींच चालक वाहक प्रशिक्षणार्थी यांची स्थगिती तात्काळ उठवून प्रशिक्षण तात्काळ सुरू करावे.
३) चालक वाहक प्रशिक्षणार्थी मुलीचं थकलेलं विद्यावेतन तात्काळ देण्यात यावे.
४) शहीद प्रशिक्षणार्थी विशाल हटवार (नागपूर), अमोल माळी (सांगली) यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेऊन २५ लाखांची मदत तात्काळ देण्यात यावी.
सदरील मागण्या चार दिवसात मान्य करा अन्यथा आपल्या कार्यलयावर अचानकपणे तीव्र स्वरूपाचे उद्रेकी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष,ऑल इंडिया पँथर सेना विनोद भोळे महाराष्ट्र महासचिवचेतन इंगळेमहाराष्ट्र सरचिटणीससंदेश वाघचौरेमुंबई प्रदेश अध्यक्ष दिला आहे
No comments:
Post a Comment