एसटी कर्मचारी अमोल माळी यांच्या कुटुंबाचे सांत्वन करतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष स्वप्निल खांडेकर
सांगली (प्रतिनिधी) २ ते ३ महिने पासुन पगार न मिळालामुळे शासनाच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावुन आपला जीवनप्रवास संपविणारा तरूण युवक व एसटी मॅकनीक कर्मचारी अमोल माळी यांच्या कुटुंबाचे सांत्वन करतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष स्वप्निल खांडेकर ; उपाध्यक्ष मानतेश कांबळे , रिपब्लिकन स्टुडंट फोरम प्रमुख अमोल वेटम आदिनी अमोल माळी यांचे कुटुंबाची भेट घेऊन दुखात सहभागी झाले.
ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख मा. दिपकभाऊ केदार साहेब यांनी जो एसटी कर्मचारी यांच्या न्यायासाठी जो लढा उभरलेला आहे यात सर्वांनी सहभागी व्हावे.
अमोल माळी यांच्या पश्चात त्यांची पत्नी ; दोन लहान मुले आहेत. व रा.प. नागपुर येथील चालक प्रशिक्षणाथीॅ विशाल हटवार यांनी ही आपली जीवन यात्रा संपवली आहे त्यांना तत्काळ शासनाने मदत द्यावी व एसटी महामंडळाने १७ जुलै रोजी काढलेला दुष्काळग्रस्त भागातील चालक कम वाहक ( प्रशिक्षणाथीॅ ) यांचा स्थगितीचा निर्णय तात्काळ रद्द करावा (जीआर रद्द) करावा व परिवहन मंत्री अनिल परब यांचा वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व एसटी कर्मचारी यांचा थकीत पगार तत्काळ देण्यात यावा.अशी मागणी
ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दिपक केदार यांनी केली आहे
No comments:
Post a Comment