मोठा गाजावाजा करित राज्य परिवहन महामंडळात
2019 मध्ये चालक कम वाहक या पदावर महिलांची नियूक्ती झाली.एस टी चे स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्यात आले आणि आता कोवीड १९ च्या महामारीत अचानक त्याचे प्रशिक्षण खंडित करून त्यांना घरी बसविण्यात आलेले आहे. त्यामुळे या चालक महिलां पुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, एसटी महामंडळात एका नव्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या महिला चालकांना परत बसचे स्टेरिंग हातात मिळावे यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयांनी त्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांना मेल द्वारे निवेदन पाठवून या महिलांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे.
एसटी महामंडळात सन २०१९ मध्ये प्रथमच चालक कम वाहक या पदावर सरळ सेवा भरती अंतर्गत २१५ आदिवासी समाजातील २१ अशा २३६ महिलांची निवड करण्यात आली. महामंडळाने पहिल्यांदा चालक पदावर महिलांची नेमणूक करून बस चालविण्याची संधी महिलांना उपलब्ध करुन देऊन एक नवे अवकाश महिलांना खुले करुन दिले. २३ ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्य सभागृह पुणे येथे शानदार समारंभात या महिला चालकांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तात्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महिला चालकांना प्रशिक्षण काळात विद्यावेतन देण्यात येईल व त्यांना वाहन चालविण्याचा परवाना काढून देण्याची जबाबदारी प्रशासन घेईन अशी घोषणा केली होती. प्रसारमाध्यमांनी या महिला चालकांच्या निवडीस मोठी प्रसिद्धी दिली होती व समाजातील सर्वच स्तरांतून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर वर स्वागत झाले होते.
वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या कालावधीत या चालक महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले. परंतु २२ मार्च २०२० पासून covid-19 च्या टाळेबंदी मुळे सर्व प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले. यानंतर या चालक महिलांना तुमचे प्रशिक्षणात थांबवण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे या महिला चालकांकडे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या या महिला एका आगळ्या वेगळ्या क्षेत्रात झेप घेऊ इच्छित असताना अचानक त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. त्यांना प्रशिक्षण कालावधीचे विद्यावेतन पण देण्यात आलेले नाही तसेच त्यांचा वाहनाचा परवाना पण अद्याप पर्यंत काढून देण्यात आलेला नाही.
ब र्याच महिला चालकांनी कर्ज काढून त्यांचे प्रशिक्षण घेतले होते .आता हे उर्वरित प्रशिक्षण सुरू होईल कि नाही व आपण सेवेत सामावून घेतले जाईल की नाही या शंकेने या महिला चालक चिंतातुर झाल्या आहेत.
या चालक पदावरील महिलांना त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून व त्यांचे उर्वरित विद्यावेतन त्यांना देऊन राज्य परिवहन सेवेत त्यांना सामावून घ्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समिती सदस्यांनी मा.संदिप शिंदे व हनुमंत ताटे यांचे मार्गदर्शन अंतर्गत राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांचे नेतृत्वाखाली रा,प.चालक महिलांना न्याय मिळवून देण्याचे अभियान हाती घेतले आहे.या अभियाना अंतर्गत उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून या महिलांना न्याय मिळवून देण्याची विनंती केलेली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मा.प्रतीभाताई पाटील माननीय नीलम ताई गोरे व माननीय सुप्रियाताई सुळे यांना पण निवेदन पाठवून या महिलांना न्याय मिळवून देणार लढा अधिक प्रखर करण्यात येईल असे राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी सांगितले आहे महिला चालकासाठी चालविलेल्या या अभियानास धुळे विभागाचा निर्भयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. धुळे विभागाच्या निर्भया प्रमुख श्रीमती निलिमा नेतकर यांच्या मार्गदर्शना अत्तर्गत धुळे विभागातील आगारातील निर्भयांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांना मेल वरून निवेदन पाठविले आहेत. हा महिला चालकाचा लढा यशस्वी करण्यासाठी धुळे विभागाच्या निर्भया प्रमुख नीलिमा नेतकर ,प्रमिला दीक्षित, भारती सोनार, स्वप्ना चौधरी यांच्या मार्गदर्शन अंतर्गत धुळे विभागातील आगारातील नीर्भयानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व परिवहन मंत्री यांना मेल वरून निवेदन पाठविले आहेत .हा महिला चालकांचा लढा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे धुळे विभागाचे अध्यक्ष श्री दीपक पांडव, संतोष वाडिले, डी. आई. राजपूत, आर. के. महाजन, एस. बी. परदेशी व निर्भया प्रमुख नीलिमा नेतकर, प्रमिला दीक्षित, छाया वडार यांनी विशेष प्रयत्न करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत
No comments:
Post a Comment