गेल्या 20 दिवसांपासुन मेधाताईंच्या मार्गदर्शनाखाली राजुभाऊ शिंदे यांनी सुरु केलेल्या रिलीफ सेंटरमध्ये सक्रीय आहे .आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त लोक येऊन गेलेत. हजारों लोंकांशी संवाद झाला. येणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्यथा-वेदना होत्या .कोरोनाची भिती नव्हती तर लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करण्याची भिती होती. या भितीची प्रचंड दाहकता मी स्वतः बघीतलीय .
उत्तर प्रदेशातील ,चंदौली जिल्ह्यातील बरीया गावातील विनयसिंग व निलमदेवी हे गावातील बिघाभर शेती गहाण ठेवून मजुरीसाठी मुंबईला गेले , लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्यावरपैसे संपले, खाण्याची पंचाईत झाली ,शेवाटी इतर लोकांसोबत 12 मे ला ते इतर लोकांसोबत टेम्पोने गावाकडे जाण्यासाठी निघाले ,पण मध्येच धुळ्याजवळ त्यांच्या टेम्पोचा अपघात झाला. त्यात एक तरुण मरण पावला तर 23 लोक जख्मी झाले. त्यात 8 लोक फ्रक्चर झाले,त्यात चार महीला होत्या. त्यात वियनसिंगलाही मार लागला तर निलमदेवीचा पाय फ्रक्चर झाला. दुर्दैवाने यात निलमदेवीसह तीन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुःखद म्हणजे 7 महीन्याच्या गरोदर असलेल्या निलमदेवीच्या 14 वर्षीय मुलाचाही पाय फ्रक्चर झाला.आठवठाभरात पॉझिटिव्ह आलेले निगेटिव्ह झाले व अपघातात जखमीं सर्व लोक आपापल्या गावी गेले ,त्यांच्यासोबत विनयसिंगचा मुलालाही पाठवण्यात .
आता गेल्या 17 दिवसांपासुन विनय व निलमदेवी दोघेच धुळे सिव्हिलला होते. मार लागलेला,फ्रक्चर झालेला पाय ,पोटात बाळ व वरुन पॉझिटिव्ह आल्याने दोघेही प्रचंड मानसिक तणावाखाली होते . पण काही दिवसांत निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने त्यांना थोंडं बरं वाटले पण लगेचच निलमदेवीला सातव्या महीन्यातच बाळंतपणाला सामोरे जावे लागले 25 तारखेला तिने बाळाला जन्म दिला ,डिलेवरी नॉर्मल पण बाळाचे वजन जेमतेम किलोभरच ,चार दिवसांपासुन काचेच्या पेटीतच होतं. निलमदेवीला अजिबात उठता-बसता येत नसल्याने विनयसिंगला सर्व बघावं लागत होतं.अशा परिस्थितीत विनयसिंग व त्याचा कल्याणचा चुलतभाऊ माझ्याशी सतत संपर्क साधत होते," कुछ भी करो भैया ,हमें घर पहुँचादो ,नहीं तो यहाँ पागल होकर हम लोक मर जाऐंगे " हे विनय वारंवार सांगत होता. दोन दिवसांपूर्वीच मी स्वतः धुळे सिव्हिलला जाऊ प्रत्यक्ष विनय व निलमदेवीला भेटलो ,दोघेही भितीने चिंताग्रस्त होते ,तिकडे मुलगा फ्रक्चर त्याचीही काळजी तर इकडे अशी बिकट परिस्थिती ,शिवाय जवळ अजिबात पैसे नाहीत ,जायचं कसं ??शिवाय विनयसिंग चे आई- वडील तो लहान असतांनाच वारले होते ,त्याला त्याच्या काकांनीच वाढवलेलं ,त्यामुळे गावाकडे पण कोणी नाही ,म्हणून सासरी पयागपुर ( वाराणसीला )जाण्याचं ठरलं ,पण अँम्ब्युलन्सशिवाय जाणं शक्य नाही,अशा दारुण अवस्थेत ,माझ्याकडे हे मोठ्या आस्थेने बघत होते .
आमच्या यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही काही रक्कम उभी केली तर डॉ.अभिनय दरवडे जे सुरवातीपासून या रिलीफ सेंटरला दररोज दोन तास वेळ देत आहेत ,त्यांनी प्रबोधन फाऊंडेशनच्या माध्यमातून काही रक्कम उभी केली . शिवाय ,प्रा.चांडक सर ,प्रा.आरती बरीदे ,प्रा. गायकवाड,कसबे सर खलाणेसर,सिमाताई,जाधव सर , विसपुते सर , निमाताई,स्वाती अशा अनेकांनी खारीचा वाटा उचलत अँम्ब्युलन्स साठी मदत दिली व आज निलमदेवी व विनयसिंगला त्यांच्या चार दिवसाच्या बाळासह गावाकडे रवाना केले . त्यांना पोहचण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्याचे दोन चुलतभाऊ कल्याणवरुन मोटरसायकलने आले होते . त्यांनी सिव्हिलला जाऊन मदत केली . अँम्ब्युलन्समध्ये अॉक्सीजन व ए.सी. ची व्यवस्था असल्यामुळे बाळाला त्याची मदत झाली. मुन्नाभाई म्हणत होते, " लडकी घर जरुर पहुँच जाएगी ,लडकीयाँ ही घरं में खुशहॉली लाती है " ! जातांना दोघांच्याही चेहऱ्यावर सुटकेचा निःश्वास टाकल्याचे दिसत होते. आज संध्याकाळी अँम्ब्युलन्स वाराणसीकडे रवाना झालीय .
गेल्या वीस दिवसांत आजचा दिवस फार बरा वाटला. मुल्यांशी कधीच फारकत नाही घेतली तर ,प्रतिकुल परिस्थितीतही काम करता येतं ! आपण व्यक्तीगत आयुष्यात चहुबाजूंनी संकटांनी घेरलेले असतांना ,आपल्यापेक्षा अधिक संकटात असलेल्या अनोळखी लोकांना आपण मदत करतो ,तेव्हा जगणं अधिक समृद्ध वाटायला लागतं. जन्म - मृत्यूच्या मध्ये ,जे काही जगणं असतं , ते मुल्यांना घेऊन जगलं तर आत्मीक समाधन देतं. भारत - इंडीयाच्या फाळणीत पोळून निघालेल्या या माणसांना माणूसकीच्या सावलीची व मदतीच्या हातांची गरज आहे .
आपला लढा कोरोनाशी आहे ,कोरोनाग्रस्तांशी नव्हे !
- संदीप विनायक देवरे.9823235945
No comments:
Post a Comment