डहाणू आगाराचे एसटी चालक स्वप्निल गुलाब विके हे आपले कर्तव्यावर असतांना मृत - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Friday, May 29, 2020

डहाणू आगाराचे एसटी चालक स्वप्निल गुलाब विके हे आपले कर्तव्यावर असतांना मृत




आज दिनांक  29 मे रोजी डहाणू आगाराचे एसटी चालक स्वप्निल गुलाब विके हे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी छत्तीसगड येथे गेलेले होते. ठरलेल्या ठिकाणी प्रवाशांना सोडून येताना मालेगाव जवळील झोडगे या गावाजवळ त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. जागेवरच बस थांबवून त्यांनी विश्रांती घ्यायला सुरुवात केली असताना येथील ग्रामस्थांना ही माहिती मिळाली. त्यांनी व सहकारी चालकाने तात्काळ एसटी चालक स्वप्निल विके यांना मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.  ही माहिती मिळताच एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी तथा नियंत्रण समितीचे अध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी मालेगाव सिविल हॉस्पिटल येथे धाव घेतली. यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली असताना त्यांनी सदर चालकास मृत घोषित केले असल्याचे कळाले. सदर घटनेची माहिती शेख यांनी आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांच्यापर्यंत पोहोचवली तदनंतर एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यांच्या मृत अहवालाची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना सदर घटनेसंदर्भात सविस्तर चौकशी करण्याची सूचना केलेली आहे. स्वर्गीय स्वप्निल गुलाब विके यांना परमेश्वर चिरशांती देवो तसेच त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या या दुःखातून त्यांना लवकरात लवकर मुक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना..

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor