सोनगीर येथील विद्युत वितरण कंपनीचा कर्मचाऱ्याचा मोटरसायकल अपघातात मृत - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Wednesday, May 27, 2020

सोनगीर येथील विद्युत वितरण कंपनीचा कर्मचाऱ्याचा मोटरसायकल अपघातात मृत


सोनगीर : शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील मूळ गाव आलेल्या व सोनगीर येथील महावितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा काल रात्री दि.26 रोजी गोराने फाट्या जवळ मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला.

वारुळ येथील सागर श्रावण गवळे(वय 23) हा तरुण सोनगीर येथे महावितरण कंपनीत लाईनमन (बाह्य श्रोत लाईनमन) म्हणून गेल्यात तीन वर्षापासून कार्यान्वीत होता. नेहमीप्रमाणे मयत हा वारूड येथील राहत्या घरून सकाळी सोनगीर येथे आपल्या लाईनमन चा कामासाठी गेला होता दिवसभर आपली ड्युटी आटोपून नेहमीप्रमाणे रात्री घरी परतत असताना काल रात्री दहा ते बारा वाजेच्या सुमारास (वेळ नक्की माहीत नाही)आपल्याजवळील होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम.एच.18 बी.क्यू.9716 ने वारुड येथील आपल्या घरी जात असताना मुंबई आग्रा महामार्ग वरील गोराणे फाट्याजवळ रोडा लगत असलेल्या बाभळीच्या झाडावर आढळून सागर गवळी हा तरुण रोडावर पडल्याने त्याच्या डोक्याचा मागील व समोरील बाजूस मार लागल्याने गंभीर दुखापत होऊन मयत झाला संबंधित अपघाताची माहिती मिळतात नरडाणा येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मयताच्या घरचा व घटनेची माहिती मिळतात नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.मयताचे काका पंडित आत्माराम  गवळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात मोटरसायकल अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या पश्चात आई वडील बहिण असा परिवारातून सोनगीर व वारुड येथे हळहळ व्यक्त केली जात असून सकाळी 11 वाजेच्या सुमारास मयत सागर गवळे यांचावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सपोनि राजगुरू यांचा मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शिंदे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor