शेतकऱ्यांचा कापुस शासना कडुन( सी.सी.आय )पुर्ण पणे सरसकट खरेदी करा मा.नगरसेवक सुरज देसले याची मागणी.. - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Wednesday, May 27, 2020

शेतकऱ्यांचा कापुस शासना कडुन( सी.सी.आय )पुर्ण पणे सरसकट खरेदी करा मा.नगरसेवक सुरज देसले याची मागणी..
















धुळे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील जवळपास ४० ते ५० टक्के शेतकऱ्यांचा कापुस अद्याप घरात पडुन आहे.
तसेच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडील कापुस खरेदी न झाल्यास आधिच गांजलेला शेतकरी कोलमडून पडेल,
त्यासाठी वेळेतच शासनामार्फत ( सी.सी.आय ) पुर्ण क्षमतेने कापुस खरेदी व्हावी.अद्याप ४० ते ५० टक्के शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडला आहे.
त्यामुळे शासनाने युध्दपातळीवर शेतकऱ्यांचा संपुर्ण कापुस( सरसकट )खरेदी करावा.पुढील १० दिवसात पावसाची शक्यता असल्याने खरेदी केलेला 
कापुस तसेच तयार झालेल्या कापसाच्या गाठी साठवणूक करण्यासाठी गोदामाची व्यवस्था योग्य पध्दतीने करावी व कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडरची 
संख्या वाढवावी जेणे करून सी.सी.आय केंद्रावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करता येईल.खरेदी केंद्रावर शेतकरी व कर्मचारी यांची 
आरोग्य तपासणी , थर्मल स्क्रीनींग करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावा.पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असुन,
कापुस विकला गेला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.तरी आपणास विनंती आहे की , 
वरील विषयाचे लवकरात लवकर नियोजन होऊन शेतकऱ्यांच्या आपेष्टा थांबवावी.अशी मागणी मा नगरसेवक सुरज देसले यांनी केली.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor