खान्देशातील कलावंताची उपासमार. - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Wednesday, May 27, 2020

खान्देशातील कलावंताची उपासमार.



















धुळे .चित्रपट, मालिका आणि नाटक या क्षेत्रामध्ये काम करणारे. खान्देशी कलाकार किंवा तंत्रज्ञ हे बऱ्यापैकी ठरवून या क्षेत्रात येतात...मी ही त्यातलाच एक.... अपघाताने इथे येणारे फार कमी आहेत... आपण जेव्हा ठरवून या क्षेत्रात येतो तेव्हा आपल्याला पूर्ण कल्पना असते की आपण एका अस्थिर क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आहोत... जिथे रोज काम असेल याची खात्री नाही आणि जेव्हा काम नसेल तेव्हा तुम्हाला कुणी पैसा देणार नाही... इथे कुठला बोनस नाही आणि रिटायर झाल्यावर पेन्शनही नाही... तरीही या क्षेत्रामध्ये आपण रमतो... कारण 2 वेळेचं अन्न देता देता हे क्षेत्र मानसिक समाधान देऊन जातं... मग या क्षेत्रात जसे तुम्ही जूने होवू लागता, तशी एक स्थिरता येवू लागते... पण ही स्थिरता कधी अस्थिरतेत बदलेल याचा काही नियम नसतो... तरीही आपण आनंदाने काम करत राहतो... हे सर्व सांगण्याचं कारण सध्या करोनामुळे आपलं क्षेत्र मागचे 2 महीने बंद आहे... पुढे कधी चालू होईल याची कुणालाच कल्पना नाही. चालू झाल्यावरही एवढ्या मोठ्या संकटानंतर सर्व सुरळीत व्हायला एक वेळ जाईल.... पण आपण याची आता किती भीती बाळगायची?  मला माहित आहे की पैशाचं सोंग घेता येत नाही, कुणाचे पहिल्या महिन्यातच पैशाचे प्रॉब्लेम सुरू झाले असणार, तर काहींचे पुढच्या काही महिन्यात होतील... आर्थिक संकट हे आपल्याला टाळता येणार नाही... 
 आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल... आपलं क्षेत्र चालवणारा मायबाप प्रेक्षकचं जर उद्या उपाशी असेल तर मनोरंजनासाठी तो किती खर्च करणार? त्यामुळे या संकटाचा फटका सर्वात जास्त आपल्याला बसणार... पण रडून काहीच होणार नाही. 
माझी आपल्या क्षेत्रातल्या सर्व लोकांना विनंती आहे की खचून जावू नका... अगदीच प्रॉब्लेम आला तर जोपर्यंत आपलं काम सुरू होत नाही तोपर्यंत  आपल्या कुवतीनुसार मिळेल ते काम करा... छोटा मोठा धंदा करा तात्पुरत...पुढे आपल्याला खान्देशातच  काम करायचं आहे.खान्देशातच जगायचं आहे आणि खान्देशातच मरायचं आहे. मला एक गोष्ट माहीत आहे की ज्याला आपलं काम येतं त्याला हे क्षेत्र उपाशी मरू देणार नाही... बाकी आपल्याला सवय आहेच अस्थिरतेची... मग धैर्याने सामोरे जाऊया की येणाऱ्या संकटाला.
 
घरात रहा सुरक्षित रहा स्वताची काळजी घ्या व आपल्या परीवाराची पण काळजी घ्या
आपलाच खानदेश जय खानदेश
 
*निर्माता /दिग्दर्शक - नरेंद्र कोळी सर, धुळे*

N.K.FILMS , DHULE & AJAY FILMS DHULE

1 comment:

Popular Posts

Sponsor