काेकण विभाग - वीज देयक कंपनीने या लॉकडाऊन च्या काळात वाढीव वीज बिल आकारून गोर गरीब जनतेवर केलेला अन्यायाच्या विरोधात लोकजागर पार्टीने शांतीपूर्ण मार्गाने,ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यात वीज देयक कंपनी च्या विरोधात तीन महिन्याचे वाढीव बील जाळून निषेध नोंदविण्यात आला. तसेच 'लवकर जागे व्हा नाही तर तुमची झोप उडवू'असा इशारा कोकण विभाग संयोजक रविंद्र रोकडे यांनी वीज वितरण कंपनीला दिला आहे,
तीन महिन्यापासून नोकरी, उद्योगधंदे बंद असल्याने बेरोजगारी मुळे उपासमारीची वेळ गोर गरिबांवर आली असून त्यातून हा वाढीव वीज बिलाचा बोजा गोर गरिबांवर टाकू नका अन्यथा राज्यात विजेचा झटका लोकजागर पार्टी मार्फत वीज देयक कंपन्यांना द्यावा लागेल सरकारने गोर गरीब जनतेचे तीन महिन्याचे वाढीव वीज बिल माफ करा किंवा वीज बिल कपात करा अशी मागणी केली आहे
No comments:
Post a Comment