मुंबई | लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांना उद्योगात तोटा झालाय अशा सर्वांसाठी काम करणार आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी याबाबतचा एक व्हिडीओही ट्विटरवर पोस्ट केला आहे. मनसेने एक नंबरही जाहीर केला आहे.
लॉकडाऊनमुळे आपली पूर्ण अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे. त्यामुळे लाखो मराठी मुलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींच्या नोकऱ्या जात आहेत. त्याचप्रमाणे अनेकांचे उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. उद्योजकांकडे पैसे नाहीत. पगार द्यायला पैसे नाहीत. लोकांकडे नोकऱ्या नाहीत. या सर्व अडचणींचा सामना करण्यासाठीच आम्ही एक नंबर जाहीर करत आहे. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांनी यावर आम्हाला संपर्क साधावा, असं संदीप देशपांडे यांनी आहे.
सरकार फक्त फेसबुकवर येते. गोड-गोड बोलते की तुमची नोकरी गेली नाही पाहिजे. पण यावर काही ठोस कारवाई करत नाही. केंद्रातून 20-20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर होतात. पण प्रत्यक्षात उद्योग क्षेत्राला काय मिळते. ठेंगा, असंही देशपांडे म्हणाले.
माझी अनेक उद्योगधंद्याना विनंती आहे की ज्यांना कामासाठी लोकं, कामगार लागणार असतील त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क साधावा. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना आम्ही या नोकऱ्या देऊ, असंही देशपांडे यांनी सांगितलं
No comments:
Post a Comment