दिल्ली : करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत म्हणजे आणखी एका महिन्यासाठी म्हणजेच 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र या कालावधीत अनेक गोष्टी शिथिल होणार आहेत. याला अनलॉक 1 असं नाव देण्यात आलं आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 5 या वेळात कर्फ्यू असणार आहे. असं असलं तरी या कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना सुट असणार आहे. तसेच शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला. संकट पाहता पाचव्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो,सिनेमा गृह हे बंद राहणार आहेत. राजकीय,समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार आहेत.बाकी सर्व नियम आता आहेत तसेच राहणार आहेत.दरम्यान,या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे.येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
-मंदिर, मशिदी आणि सर्व प्रार्थनास्थळं 8 जूनपासून उघडणार
-हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल 8 जूनपासून उघडणार
– वरील गोष्टींसाठी लवकरच आरोग्य विभाग नियमावली जाहीर करणार
-शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दलचा निर्णय जुलै 2020 मध्ये घेणार
-राज्य सरकार शैक्षणिक संस्था आणि पालकांसह चर्चा करून केंद्राला कळवणार, त्यानंतर निर्णय
-सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान तोंडावर मास्क किंवा कापड बांधणं बंधनकारक
-लॉकडाऊन कंटेनमेंट झोन्समध्ये 30 जूनपर्यंत सुरू राहील. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. लोकांच्या आत-बाहेर येण्यावर बंदी असेल.
– कंटनेमेंट झोन्सच्या बाहेर बफर झोन्स आखण्याचा निर्णय राज्य सरकार घेतील. बफर झोन्समध्ये आवश्यक ते निर्बंध राज्य सरकार घालू शकतात.
-सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं बंधनकारक. दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची. एका वेळी 5 लोकांनाच दुकानात प्रवेश द्यावा.
-लग्न समारंभात केवळ 50 लोकांनाच बोलवता येणार तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ 20 लोकांनाच बोलवता येणार
-सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारणार.
-सार्वजिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर बंदी.
-शक्य असेल तर घरूनच काम करा.
-एका वेळी ऑफिसांत किंवा दुकानांत किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तासांनुसार माणसांचं विकेंद्रीकरण करा.
-रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलली. आता रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू.
-राजकीय, सांस्कृतिक तसंच कोणत्याही स्वरुपाच्या कार्यक्रमाला परवानी देण्यात आलेली नाही.
-ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment