धुळे : जिल्ह्यात करोना रुग्णांचा वाढता आलेख चिंतेत भर घालणारा असून आताच प्राप्त अहवालानुसार ४ रुग्णांचे करोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील तालुक्यातील विंचूर येथील एक युवतीचा मृत्यू झाला असून त्या युवतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बाहेरील जिल्ह्यातील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२४ वर पोहचली आहे.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यात आढळलेले ३ रुग्ण हे शहरातील आहे. देवपूरमधील पोलिस कर्मचारी, शिवाजीनगर भागातील व्यक्ती, पोस्ट आॅफिसचा कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांचा आकडा हा ८७ वर पोहचला आहे.
No comments:
Post a Comment