दिवसभरात नाशिक जिल्हयात ५०, जळगावात ४८, धुळ्यात ११ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले- धोका वाढला - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Thursday, May 28, 2020

दिवसभरात नाशिक जिल्हयात ५०, जळगावात ४८, धुळ्यात ११ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले- धोका वाढला




धुळे- जिल्हयात दिवसभरात नवीन ५० रुग्ण आढळून आले असून यात मालेगावातील सर्वाधिक ३२ रुग्ण आहे. या ३२ रुग्णांमध्ये २६ पुरुष ६ महिला आहे. विशेष म्हणजे या ३२ रुग्णांमधील ६ मालेगाव पोलिस तर ५ मुंबई रेल्वे पोलिसांचा समावेश आहे.३२ रुग्ण सोडून उर्वरित रुग्ण नाशिक शहर व जिल्ह्यातील आहे.

मालेगावातील ३२ रुग्ण वगळता १३ नाशिक शहर, १ नांदगाव,  १ ओझरमधील रुग्ण आणि ३ जिल्ह्याबाहेरील करोना पॉझिटिव्ह सापडले आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ११०८ वर गेली  आहे.

धुळे जिल्हा रुग्णालयात  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १३२ असून एकूण बरे झालेले संख्या ६५ आहे तर करोनामुळे १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ५१ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. सायंकाळी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील आलेल्या १४ अहवालांपैकी ७ निगेटीव्ह असून ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात  अंबिका नगर शिरपूर येथील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील कुटूंबातील ६ लोकांचा ज्यात ३८ वर्षीय पु, २१ स्त्री, १७ -मुलगी, १४-मुलगा, १५-मुलगी, ८ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.  तर एक रुग्ण ५६ वर्षीय पुरुष पारधीपूरा शिरपूर येथील असून असे एकूण ७ रुग्ण करोना बाधित आढळले आहे. आज दिवसभरात  धुळे जिल्हयात ११ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून यात शिरपूरात ७, धुळे शहरात ३ व धुळे तालुक्यातील विंचूर येथील तरुणीचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ४८ करोना बाधित रुग्ण आढळले. आज सकाळी  जळगाव, जामनेर, पहूर, रावेर येथील २२ अहवाल प्राप्त झाले होते त्यातील १७ अहवाल निगेटिव्ह तर ५ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दि.२८ सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पहूर येथील दोन व्यक्तींचा तर जळगाव, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश होता. सायंकाळी  भडगाव, नशीराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ, जळगाव येथील १४९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल सायंकाळी प्राप्त झाले होते त्यातील १२० अहवाल निगेटिव्ह आले आहे तर २९ अहवाल पॉझिटिव्ह आले होते .

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत २३३ करोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आता रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आज आणखी १४ बाधित रुग्ण आढळले. पाचोरा, रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव येथील १०६ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी ९२ अहवाल निगेटिव्ह आले तर १४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा चे तीन, निभोंरासीम येथील तीन, रावेर येथील एक, भोकर येथील तीन, भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील डहाके नगर, कोळीवाडा, पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक व्यक्तींचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित रूग्णांची संख्या ५७१ झाली आहे

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor