पुणे - अक्षय बोऱ्हाडे नामक तरुणास मारहाण केल्यानंतर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आता याप्रकरणी सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे नामक तरुणाला मारहाण केल्याचा आरोप विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर करण्यात आला होता.
सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून मारहाण केली, तसेच बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप अक्षय बोऱ्हाडेने केला होता. याप्रकरणी त्याने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली होती.
दरम्यान, अक्षयच्या या आरोपानंतर विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती.खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षयला पाठिंबा देत त्याला मारहाण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यानंतर काल विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
No comments:
Post a Comment