धुळे : शहरात कमी वयात कमी उंचीत चांगल्यांना आस्मान दाखवणारा लढवय्या, जिद्दी, चपळ मल्ल मल्हार जगताप (२१) याचा आज सकाळी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळे शहरात घडली आहे.
शहरातील साक्री रोडवरील संघमा चौकात राहणारा मल्ल मल्हार जगताप हा आज दि.२९ मे सकाळी नकाने तलावात मित्रांसोबत पोहायला गेला होता. बराच वेळ होऊन देखील पाण्याबाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी हाक दिली मात्र मदतीसाठी उशीर झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली. मल्ल मल्हार जगतापचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. मल्ल मल्हार जगताप हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
No comments:
Post a Comment