![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQPea5FdRYwQ4lEY2U1oXPRWG_3cFFG6ikqqVYaSxKqFj051VZz1rZ9dqOHzdEAnFVqxYeFKr2grvzEwZBj82e5m0c6l0jmWTSF0uTV8FKPo94jGpx4Y7aOyaGyNuUBCf9ZpPWmED9hjY/w400-h226/maxresdefault.jpg)
समाज बांधवांनो समाजाच्या प्रगतीसाठी भविष्यातील विवाह हे छोटेखानी पद्धतीनेच झाले पाहिजेत.
आपण ही उच्चभ्रू समाजाचा आदर्श घेऊया.
करोना मुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रम, अंतविधी यांना मर्यादा घातल्या, ही बाब आता लक्षात घेता आली पाहिजे.
1) शेती चे उत्पन्न कमी होत चालले आहे.
2) शेती मालाला भाव नाही.
3) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाही.
4)खाजगी नोकरीत शाश्वती नाही.
5) मुलीच्या लग्नाला 100000 रु खर्च येत असेल तर मुलालाही 80000 रु खर्च येतो.
6) आम्ही कर्जात जन्मलो कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या आता तरी डोळे उघडले पाहिजे.
7) विवाह हा फक्त सोहळा नाही तर तो संस्कार आहे , म्हणजे सोळा संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.
8) किती ही मोठं लग्न केलं तर लोक विसरून जातात.
9) आपण शेती विकून गुंठ्यावर आलो तर व्यापारी एक दुकानाचे चार दुकाने होत आहे.
10 ) इर्षा सोडा.
11) भाऊ बंदकी तील जीव घेणी स्पर्धा कुठंच नको लग्नात तर नको.
12 ) वर वधु यांनी उपयोगी पडणार पोशाख घेतला पाहिजे.
13) वरमाई ने सुध्दा रुसवे फुगवे घेऊ नये आपल्यालाही मुलगी आहे, सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे ही भावना रुजली पाहिजे.
14) जेवणावळी, मान पान वरील खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.
15) मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी नको स्वागत समारंभ साधेपणात आसावा.
16) अहो क्रिकेट 5 दिवसाचा वन डे वरुन 20 20 वर आला तर आपण विवाह वन डे मध्ये सगळं करायला काय हरकत आहे.
17) मोजक्या लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो
18) आजची बचत उद्याची निर्मिती.
19) करोना ची मंदी ही आपल्याला सुधारण्यासाठी संधी
20) चला आपणही आपल्या समाजाच्या सुधारणेसाठी व उन्नतीसाठी आपलेही योगदान देऊया.
एक पाऊल समाज सुधारण्यासाठी टाकू या.
No comments:
Post a Comment