अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Sunday, June 14, 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या



बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये 'काइ पो चे' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. 'शुद्ध देसी रोमान्स', 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी', 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor