छापा टाकून एका दलालासह दोन पीडित महिला आणि एका रॅकेट चालवणाऱ्या मालकिणीला अटक केली. अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.छापा पडल्यानंतर मूळ घरमालक असणाऱ्या पोलिसाला माहिती मिळताच तो, सुन्न होऊन त्याच्या पायाखालची वाळूच सरकल्याची परिस्थिती काल होती.
जळगाव, :- शहरातील वाघनगर शिक्षक कॉलनीत भागात कुंटणखान्यासाठी भामट्यांनी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याचे घर भाड्याने घेतले होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक, डॉ.नीलाभ रोहन, गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकून एका दलालासह दोन पीडित महिला आणि एका रॅकेट चालवणाऱ्या मालकिणीला अटक केली. अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.छापा पडल्यानंतर मूळ घरमालक असणाऱ्या पोलिसाला माहिती मिळताच तो, सुन्न होऊन त्याच्या पायाखालची वाळूच सरकल्याची परिस्थिती काल होती. शेजाऱ्यांनाही याची कल्पना नसताना पोलिसांनी छापा टाकल्याने खळबळ उडाली.
वाघनगर भागातील शिक्षक कॉलनीमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचे घर विजय आनंदा सोनवणे (वय-26 , रा. पाण्याच्या टाकीजवळ खंडेरावनगर) यांनी भाड्याने घेतले होते. रहिवासी भागात असलेल्या या घरात बाहेरून महिला येऊन देहविक्रय व्यवसाय करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकाने पंचांसह बनावट ग्राहक पाठवून सोमवारी रात्री या कुंटणखान्यावर छापा टाकला. छाप्यात विजय सोनवणे याच्यासह कुंटणखाना मालकीण आणि अन्य दोन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी कुंटणखाना मालकीण, दलाल विजय अनंदा सोनवणे अशांच्या विरुद्ध अनैतिक देहव्यापार अधिनियमाअंतर्गत (पिटा ऍक्ट) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांना आज तपासाधीकारी रविकांत सोनवणे यांनी जिल्हा न्यायालयात हजर केले, दलाला सहित कुंटणखाना मालकीण महिलेची कारागृहात रवानगी करण्यात आली असून दोन्ही पीडित तरुणींना आशादीप शासकीय वसतिगृहात पाठवण्यात आले आहे.
त्या पोलिसाची "कानखडी'
ड्यूटी पासून घर लांब पडत असल्याने राहते घर भाड्याने देवून शहरात राहण्यास आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला कारवाईनंतर गंभीर प्रकार कळताच त्याने "कानखडी' घेत घराला कुलूप ठोकले असून येथून पुढे कुणालाही घर भाड्याने देणारच नसल्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment