बरदापूर तालुका अंबाजोगाई येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगड मारून पुतळा फोडुन विटंबना केलेली आहे. तात्काळ समाजकंटकाला अटक करणे व, पुतळा नव्याने उभारणे पॅन्थर -सागर मोहिते - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Monday, November 2, 2020

बरदापूर तालुका अंबाजोगाई येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगड मारून पुतळा फोडुन विटंबना केलेली आहे. तात्काळ समाजकंटकाला अटक करणे व, पुतळा नव्याने उभारणे पॅन्थर -सागर मोहिते



प्रतिनिधी ( धुळे ) बरदापूर तालुका अंबाजोगाई येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगड मारून पुतळा फोडुन विटंबना केलेली आहे. तात्काळ समाजकंटकाला अटक करणे व  पुतळा नव्याने उभारणे अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे 

गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रभर सतत महामानवाच्या पुतळ्याची विटंबना सुरू आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बरदापूर या गावातील पुतळ्यावर रात्री दगडफेक करून पुतळा फोडण्यात आला आहे. जातीय दंगली पसरवण्याचा व आंबेडकरी जनतेचे मन दुखवण्याचा हा खोडसाळपणा आहे. सदरील घटनेमुळे महाराष्ट्रभर आंबेडकरी जनतेत संताप निर्माण झाला आहे. 

राज्यभर या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात मागच्या काळात सतत दलित अत्याचार वाढले आहेत. अंबाजोगाईत सुद्धा तसे दलित अत्याचार घडले आहेत. जातीयवाद्यांना पाठीशी घालण्याचे प्रकरणे जास्त याठिकानी घडले आहेत. जातीयवाद्यांच्या मुसक्या आवळलेल्या नाहीत म्हणून मनुवादी बोकाळले आहेत आणि ते संविधाननिर्मात्याच्या विटंबना करू लागले आहेत. 

ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करीत असून तात्काळ समाजकंटकाना अटक करा, लवकरात लवकर नवीन पुतळा उभारावा. आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. राजगृहावर दगडफेक झाली, नांदेडला याआधी पुतळ्याची विटंबना झाली त्यामुळे राज्य सरकारने प्रकरण गंभीरतेने घेऊन पुतळ्यांच्या विटंबने मागील मास्टरमाईंड सुद्धा शोधले पाहिजेत. अशी ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते धुळे, महिला जिल्हाध्यक्ष मायाताई पानपाटील, धुळे कायदेशीर सल्लागार एडवोकेट विलास जी भामरे धुळे,  तालुका संघटक भाऊसाहेब बळसाने,  धुळे तालुका सचिव किरण भाऊ धिवरे, आकाश बाविस्कर आनंद सागर आदी पदाधिकारी उपस्थित होते


No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor