नवी दिल्ली : - कोरोना व्हायरस महामारीमुळे मोदी सरकार महिला जनधन खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहे. जनधन खातेधारकांच्या खात्यात 500 रुपयांचा तिसरा आणि शेवटचा हप्ता जमा करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा सरकारने 2 वेळा 500-500 रुपये पाठवले आहेत. बँकांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. खाते क्रमांकाच्या आधारे पैसे काढण्याची सुविधा दिली आहे.
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात जनधन योजनेची सुरूवात केली होती. या योजनेंतर्गत देशातील गरीबांचे झिरो बॅलन्स खाते बँक, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते. पंतप्रधान जनधन योजना (पीएमजेडीवाय) अंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात.
हे आहेत खात्याचे फायदे :
- 6 महीने बाद ओव्हरड्राफ्ट सुविधा
- 2 लाख रुपयांपर्यंत अॅक्सिडेंटल इंन्श्युरन्स कवर
- 30,000 रुपयांपर्यंत लाईफ कवर, जे लाभार्थीचा मृत्यू झाल्यानंतर योग्य त्या शर्ती पूर्ण केल्यानंतर मिळतात.
- डिपॉझिटवर व्याज मिळते.
- खात्यासह फ्री मोबाईल बॅकिंग सेवा दिली जाते.
- जनधन खाते उघडणार्यास रुपे डेबिट कार्ड दिले जाते, ज्याद्वारे पैसे काढता येतात, किंवा खरेदी करता येते.
- जनधन खात्याद्वारे विमा, पेन्शन, प्रॉडक्ट्स खरेदी करणे सोपे आहे.
- जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन सारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडले जाते.
- देशभरात पैसे ट्रान्सफरची सुविधा
- सरकारी योजनांचे पैसे थेट या खात्यात येतात.
जनधन खाते कसे उघडावे याबाबत आपण माहिती घेवूयात…
नवे जनधन खाते उघडायचे असल्यास जवळच्या बँकेत जाऊन ते सहज उघडता येते. यासाठी बँकेमध्ये तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर, बँक ब्रांचचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न व अवलंबून असणार्यांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड नंबर, व्हिलेज कोड किंवा टाऊन कोड इत्यादी माहिती द्यावी लागते.
जुन्या खात्याला असे बनवा जनधन खाते
तुमचे जर जुने एखादे बँक खाते आहे तर त्यालाही जनधन खात्यात बदलता येऊ शकते. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि एक फॉर्म भरताच आपले बँक अकाऊंट जनधन योजनेत ट्रान्सफर करण्यात येईल.
हे कागदपत्र आहेत आवश्यक
आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅनकार्ड, वोटर कार्ड, एनआरईजी जॉब कार्ड, अथॉरिटीकडून पत्र, ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार नंबर असावा, गझेटेड अधिकार्याद्वारे जारी लेटर ज्यावर खाते उघडण्याचा अटेस्टेड फोटो लावलेला असावा.
No comments:
Post a Comment